महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदी गजानन कीर्तिकर तर कोषाध्यक्ष पदी मंगल पांडे याची निवड

गजानन कीर्तिकर व मंगल पांडे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष पदी निवड. इतर पदांची निवड ही बिनविरोध झाली होती. आज दि.२५नोव्हेंबर रोजी झालेल्या या दोन पदांकरिता निवडणूक घेण्यात आली.

कार्याध्यक्षच्या पदाकरिता मुंबई उपनगरचे कबड्डी असो.चे अध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर व औरंगाबाद कबड्डी असो.चे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर यांच्यात तर कोषाध्यक्ष पदाकरिता परभणी जिल्हा कबड्डी असो.चे कार्यवाह मंगल पांडे व कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांच्यात सरळ लढत होती.

मतदानासाठी २५ संलग्न जिल्ह्याचे ७४ प्रतिनिधी पात्र ठरले होते. त्यापैकी ७१ सदस्यांनी मतदान केले. गजानन कीर्तिकर यांना ५१ मते मिळाली, तर दत्ताभाऊ पाथरीकर यांना १९ मते मिळाली. एक मत बाद झाले. ३२ मतांनी कीर्तिकर कार्याध्यक्षपदी निवडून आले. मंगल पांडे यांना ४७ मते मिळाली, तर रमेश भेंडीगिरी यांना २४ मते मिळाली. २३ मतांच्या फरकाने पांडे हे कोषाध्यक्षपदी निवडून असले.

निवडणूक निर्णायक अधिकारी भानुदास यादव तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सदानंद माजलकर यांनी काम पाहिले.

बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी खालील प्रमाणे:-
१)अध्यक्ष :- अजितदादा पवार (पुणे).

२)उपाध्यक्ष:- १)देवराम भोईर (ठाणे), २)अमरसिंह पंडित (बीड), ३)शशिकांत गाडे (अहमदनगर), ४)दिनकर पाटील (सांगली), महिला राखीव:- १)शकुंतला खटावकर (पुणे), २)नेत्रा राजशिर्के (रत्नागिरी).

३) सरचिटणीस :- आस्वाद पाटील (रायगड).

४) सहचिटणीस :- १)रवींद्र देसाई (रत्नागिरी), २)मदन गायकवाड (सोलापूर), ३)मोहन गायकवाड, ४)महादेव साठे (उस्मानाबाद), महिला राखीव :-१) सिय्यदा पटेल (नांदेड), २) स्मिता जाधव (परभणी).